लातुरमध्ये पाणीटंचाईमुळे 20 ठिकाणी जमावबंदी

March 18, 2016 10:19 AM0 commentsViews:

Latur-drought-5

लातूर – 18  मार्च : महाराष्ट्रात भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने पाण्यासाठी जनक्षोभ उसळू नये म्हणून प्रशासनाने खबरदारीचे उपाय योजण्यास सुरूवात केली आहे. लातूर जिह्यात जिल्हाधिकाऱयांनी पाण्याच्या टाक्या आणि टँकर भरण्याच्या ठिकाणी 10 मेपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे.

दुष्काळ आणि पाणीटंचाईची समस्या मराठवाडय़ात सर्वाधीक आहे. मराठवाडय़ात फक्त 8 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक ठिकाणी जनसामान्यांना पाण्यासाठी वणवण करत फिरावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पाण्यासाठी आंदोलन होण्याची भीती लक्षात घेऊन लातूर जिह्यात 20 ठिकाणी जमावबंदी आदेश देण्यात आला आहे. तसेच टंचाई निवारणासाठी उपायोजना करण्यात येत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close