महाबजेटमध्ये अंगणवाडी सेविकांना विमा कवच

March 18, 2016 7:26 PM0 commentsViews:

anganwadi18 मार्च : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिला आणि अंगणवाडी महिलांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. महिलांसाठी महामार्गांवर 400 शौचालयं बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. यासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आलीये. तसंच अंगणवाडी सेविकांसाठी 2 लाखांचा जीवन विमा आणि 2 लाखांचा अपघात विमा काढण्यात येणार आहे. आणि विम्याचा हप्ता सरकार भरणार आहे.

महिला आणि अंगणवाडीसाठी तरतुदी

- 400 शौचलयं बांधण्यासाठी 50 कोटी
- नव्या महिला सक्षमीकरण योजनेसाठी 10 कोटी
- मुंबई, नवी मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवलीतल्या महिलांसाठी 300 तेजस्विनी बसेस
- बसेससाठी 500 कोटींची तरतूद
- मुलींच्या वसतिगृहासाठी 50 कोटी
- 10 हजार आदर्श अंगणवाड्यांसाठी 100 कोटी
- ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेसाठी 25 कोटी
- अंगणवाडी सेविकांसाठी 2 लाखांचा जीवन विमा आणि 2 लाखांचा अपघात विमा
- विम्याचा हप्ता सरकार भरणार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close