अणुउर्जा प्रकल्पांना सर्व पक्षांचा विरोध

March 17, 2010 12:16 PM0 commentsViews: 7

17 मार्चकोकणात येऊ घातलेल्या अणुऊर्जा आणि औष्णिक वीज प्रकल्पांविरोधात आज सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत सरकारच्या धोरणांचा निषेध केला.रिडालोसने निमंत्रित केलेल्या या मोर्चात भाजप, शिवसेना. मनसे आणि रिडालोसचे सर्व घटक पक्ष सहभागी झाले. कोणत्याही परिस्थितीत जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प कोकणावर लादू देणार नाही, अशा निर्धार सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केला. राज्य सरकारने कोकणच्या पर्यावरणाबाबतचे धोरण केंद्रसरकारकडे तातडीने मांडावे, म्हणून उद्यापासून सुरू होणार्‍या विधानसभेच्या अधिवेशनातही कोकणातल्या आमदारांकडून सरकारवर दबाव आणला जाणार आहे.

close