‘माकडांनी घेतला घराचा ताबा’

March 18, 2016 9:38 PM0 commentsViews:

औरंगाबाद 18 मार्च : दत्त विहार भागात माकडांचा एक वेगळाच भावनिक पैलू बघायला मिळाला. माकडांच्या टोळीयुद्धात एक माकड जखमी झालं. जखमी झालेलं माकडं स्वरक्षणासाठी दत्त विहार भागातील अनिल संसारे यांच्या स्वयंपाक घरात घुसून बसलं. प्रतिस्पर्धी टोळीतील माकडांनी किंवा वस्तीमधील नागरीकांपासून जखमी माकडावर हल्ला करू नये यासाठी जखमी माकडाच्या साथीदारांनी त्या घरावरच ताबा घेतला. ते नागरीकांनाही घरात जावू देत नव्हते. जवळपास सहा ते आठ तास या माकडांनी घरावर ताबा घेतला होता. जखमी माकडही स्वयंपाक घरात दडून बसलं. शेवटी वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घराबाहेरील माकडांना हुसकून लावले आणि जखमी माकडाला सुरक्षित घराबाहेर काढले आणि वस्तीमधील नागरीकांनी सुटकेचा श्वास घेतला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close