हेडली कबुली देण्याची शक्यता

March 17, 2010 12:21 PM0 commentsViews: 2

17 मार्चमुंबई हल्ल्यासंबंधी आरोप असलेला डेव्हिड हेडली गुरुवारी अमेरिकन कोर्टासमोर आपल्या गुन्ह्याची कबुली देण्याची शक्यता आहे. हेडलीच्या वकील जॉन थीप यांनी ही माहिती दिली आहे. एफबीआयने हेडलीविरुद्ध चार्जशीट दाखल केले आहे. याआधी आपला या बाबतीत कुठलाही संबंध नसल्याचे हेडलीने म्हटले होतं. मात्र आता तो गुन्हा कबूल करण्याची शक्यता आहे. 26/11 च्या हल्ल्यामागे हेडलीचाच ब्रेन असल्याची माहिती पुढे येत आहे.

close