डॉ. भालसिंग यांना पोलीस कोठडी

March 17, 2010 12:28 PM0 commentsViews: 2

17 मार्चनाशिकचे लाचखोर सिव्हिल सर्जन डॉ. भालसिंग यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यांना काल अँटीकरप्शनने ताब्यात घेतले होते.गेल्या चौदा दिवसांपासून ते फरार होते. त्यांचा पी. ए. रवींद्र बार्‍हे याला अँटीकरप्शनने लाच घेताना रंगेहात पकडले होते.त्यावेळी बार्‍हेकडून 10 लाख रुपयांची रक्कम आणि काही आक्षेपार्ह कागदपत्र जप्त करण्यात आली होती. तेव्हापासून अँटीकरप्शन विभाग डॉ. भालसिंग यांच्या मागावर होते. आता बिले मंजूर करण्यासाठी टक्केवारी वसूल करणारी मोठी साखळी यातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

close