पुण्यात नातवाचा खून करून आजोबांची आत्महत्या

March 19, 2016 2:04 PM0 commentsViews:

kolhapur crimeपुणे – 19 मार्च : नातवाचा खून करून आजोबांची आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडलीये. आजोबांनी आपल्या अवघ्या दहा वर्षांच्या नातवाचा गळा दाबून खून करून नंतर स्वतः इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीय. जिनय शहा असं खून झालेल्या दहा वर्षाच्या नातवाचं नाव आहे तर सुधीर दगडूमल शहा हे 65 वर्षांचे आजोबा आहेत. आज पहाटे कोंढव्यातील जैन सोसायटीत हा प्रकार घडला. पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close