सुप्रिया सुळे आर्थर जेलमध्ये छगन भुजबळांच्या भेटीला

March 19, 2016 2:14 PM0 commentsViews:

 suriya_sule_meet_bhujbal

मुंबई – 19 मार्च : मनी लाँड्रिंग आणि महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची आज सुप्रिया सुळेंनी आर्थर जेलमध्ये जाऊन भेट घेतली आहे. सकाळी अकराच्या सुमारास त्या भुजबळांना भेटल्या.

राष्ट्रवादी भुजबळांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे हे दाखवण्यासाठीच सुप्रिया जेलमध्ये गेल्या होत्या. पण या भेटीबाबत पत्रकारांनी त्यांना विचारलं असता त्यांनी चक्क होळीचा बाईट देऊन पत्रकारांची बोळवण केली. भुजबळ यांना 31 मार्चपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close