एमईटी घोटाळा प्रकरण पंकज भुजबळांची चौकशी

March 19, 2016 2:21 PM0 commentsViews:

pankaj_bhujbal4मुंबई – 19 मार्च : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सध्या आर्थर रोड जेलमध्ये कोठडीत आहेत. तर दुसरीकडे आज छगन भुजबळांचे आमदार पूत्र पंकज यांचीही मुंबई धर्मदाय आयुक्तालयात चौकशी सुरू आहे. अतिरिक्त धर्मादाय आयुक्त पंकज यांची चौकशी करतायेत, असं सूत्रांकडून कळतंय.

एमईटी प्रकरणी पंकज भुजबळांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. पंकज भुजबळ 12 च्या सुमारास धर्मादाय आयुक्तालय येथे आले होते. सहाय्यक धर्मादाय आयुक्त एम डी गाढ़े समोर पंकज भुजबळ यांची उलट तपासणी होत आहे. सुनील कर्वे यांचे वकील देवदत्त सिंह हे पंकज भुजबळ यांची उलट तपासणी करत आहे. आतापर्यंत पंकज भुजबळ यांना देवदत्त यांनी 21 प्रश्न विचारण्यात आले. दुपारच्या सत्रातही त्यांची चौकशी होणार आहे. एमईटी हे ट्रस्ट आहे, ज्याच्या अंतर्गत मुंबईत मोठं एमईटी महाविद्यालय चालवलं जातं. भुजबळांच्या चौकशीदरम्यान अशाही बातम्या येत होत्या की काही आर्थिक गैरव्यवहार एमईटीच्या मार्गे केले गेले. याबाबतच धर्मादाय आयुक्तांनी पंकजना बोलावलंय का, हे पाहावं लागेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close