रिक्षाभाडे वाढ फेटाळली

March 17, 2010 12:31 PM0 commentsViews: 6

17 मार्चपेट्रोल दरवाढीनंतर पुण्यात रिक्षाभाडे वाढ करावी अशी रिक्षा संघटनांची मागणी होती. पण प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ती फेटाळून लावली आहे. रिक्षाचालकांनी पेट्रोलऐवजी सीएनजीचा आग्रह धरावा असा सल्लाही प्राधिकरणाचे अध्यक्ष दिलीप बंड यांनी दिला होता. पण बंड यांच्या निर्णयास रिक्षा चालकांकडून विरोध होण्याची चिन्हे आहेत. पुण्यात सध्या 75 हजार परवानाधारक रिक्षा आहेत. त्यापैकी 30 हजार रिक्षा एलपीजीवर चालविण्यात येतात. तर इतर रिक्षा पेट्रोलवर आहेत. तर या संख्येसाठी शहरात सीएनजीचे केवळ पाच पंप आहेत. तर पिंपरीत दोन आहेत. रिक्षांची संख्या लक्षात सीएनजीचे आणखी पंप असणे आवश्यक आहेत. पण हे पंप उपलब्ध झाल्यानंतरच रिक्षा सीएनजीवर परावर्तीत करू असे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. पण पेट्रोलवर चालणार्‍या रिक्षांसाठी भाडे वाढ करणे गरजेचे असल्याचे मतही रिक्षा चालकांनी व्यक्त केले आहे.

close