टी -20 वर्ल्डकपमध्ये भारताने आतापर्यंत चार वेळा पाकला लोळवलं

March 19, 2016 4:39 PM0 commentsViews:

indvspak3419 मार्च : भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं तर दोन्ही देशातील चाहत्यांसाठी जणू हे दुसरं युद्धच…आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर भारताने प्रत्येक वेळी पाकिस्तानला हरवलंय. विश्वचषकात भारताने पाकिस्तानला आत्तापर्यंत 10 वेळा पराभूत केले आहे. टी- 20 मध्ये 4 वेळा तर एकदिवसीय सामन्यात 6 वेळा भारताने हा पराक्रम केला आहे.

2007 मध्ये डर्बन इथं झालेल्या भारत-पाकिस्तान पहिला टी-20 सामन्यामध्ये पाकिस्तानला विजयासाठी 141 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. पण, हा सामना टाय झाला. त्यानंतर बॉल आऊटमध्येमध्ये भारताने विजय मिळवला. त्यानंतर जोहान्सबर्गमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्येच अंतिम लढाई झाली. या सामन्यात भारताने पाकिस्तानला विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने पाकिस्तानला 19.3 षटकांत 152 धावांत गुंडाळलं आणि टी-20 विश्वचषकावर भारतानं नाव कोरलं. हा विजयाचा प्रवास पुढे थांबला नाही. 2012 मध्ये कोलंबो आणि 2014 मध्ये मिरपूरमध्येही भारताने पाकिस्तानला हरवलं. त्यामुळे आजच्या कोलकाता ईडन गार्डनवर होणार्‍या महामुकाबल्याकडे सार्‍या देशाचं लक्ष लागलंय.

 भारत-पाक टी-20 – काय झालं आतापर्यंत?

2007 – डर्बन
भारत-पाकिस्तान पहिला टी-20 सामना
पाकिस्तानला विजयासाठी 141 धावांचं आव्हान
हा सामना टाय
अखेर बॉल आऊटमध्ये भारताचा विजय

2007 – जोहान्सबर्ग
भारत आणि पाकिस्तानमध्येच अंतिम लढाई
पाकिस्तानला विजयासाठी 158 धावांचं आव्हान
पाकिस्तानला 19.3 षटकांत 152 धावांत गुंडाळलं
टी-20 विश्वचषकावर भारतानं कोरलं नाव

2012 – कोलंबो
विराट कोहलीचं नाबाद अर्धशतक
कोहलीच्या खेळीनं टीम इंडियाचा विजय
भारताचा 8 विकेट आणि 3 ओव्हर राखून विजय

2014 – मिरपूर
विश्वचषकात टीम इंडियाला उपविजेतेपद
पाकिस्तानला सात विकेट्सनी सहज लोळवलं
पाकिस्तानवर टी-20 विश्वचषकातला चौथा विजय

टीम इंडियाचे शिलेदार

विराट कोहली
मॅच – 19
रन – 1391
सर्वोत्तम – 90

रोहित शर्मा
मॅच – 56
रन – 1209
सर्वोत्तम – 106

शिखर धवन
मॅच – 19
रन – 374
सर्वोत्तम – 60

महेंद्रसिंग धोनी
मॅच – 64
रन – 982
सर्वोत्तम – 48

युवराज सिंग
मॅच – 52
रन – 1086
सर्वोत्तम – 77
 
जसप्रित बुमराह
मॅच – 12
विकेट – 16
सर्वोत्तम – 3/23

हार्दीक पंड्या
मॅच – 12
विकेट – 10
सर्वोत्तम – 3/8

आर.अश्विन
मॅच – 39
विकेट – 47
सर्वोत्तम – 4/8

हरभजन सिंग
मॅच – 28
विकेट – 25
सर्वोत्तम – 4/12

आशिष नेहरा
मॅच – 19
विकेट – 27
सर्वोत्तम – 3/19
 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close