नवी मुंबईत पाणीचोरी, रहिवाशी पाण्याच्या ड्रम्सला ठोकलं टाळं !

March 19, 2016 4:58 PMComments OffViews:

navi_mumbai34नवी मुंबई – 19 मार्च : राज्यात पाणी टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण रूप धारण करत आहे. नवीमुंबईत तर पाणीबाणी लागू झाली असून लोकं चक्क पाणी चोरी करत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे लोकांनी ड्रम्स आणि पाण्यांच्या टाक्यांना लॉक लावून ठेवलंयय

नवी मुंबई महापालिकेने सद्या 32 टक्के पाणीकपात जाहीर केलीये. त्यामुळे आता शहरात फक्त 3 तासचं पाणीपुरवठा केला जाणार आहे. मोरबे धरणातील शिल्लक असलेलासाठी जुलैपर्यंत पुरावा यासाठी ही पाणीकपात केली गेलीये. त्यामुळं लोकांनी आता पाणी साठवायला सुरवात केलीये. ड्रम विकत आणून ते दरवाजात पाणी भरून ठेवले जाताय. पण, हे पाणी चोरीला जात असल्याचं समोर आलंय. म्हणूनच रहिवाशांनी आता पाणी भरून ठेवलेल्या ड्रमला टाळे लावण्यास सुरवात केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


Comments are closed

close