एमईटी गैरव्यवहार प्रकरणी पंकज भुजबळांची 28 तारखेला पुन्हा उलटतपासणी

March 19, 2016 7:01 PM0 commentsViews:

Pankaj bhujbal1219 मार्च : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे आमदार पूत्र पंकज भुजबळ यांचीही आज (शनिवारी) मुंबई धर्मदाय आयुक्तालयात चौकशी झाली. येत्या  28 तारखेला पुन्हा उलटतपासणी होणार आहे.

एमईटी प्रकरणी पंकज भुजबळांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पंकज भुजबळ 12 च्या सुमारास धर्मादाय आयुक्तालय येथे पोहचले होते. सहाय्यक धर्मादाय आयुक्त एम डी गाढ़े समोर पंकज भुजबळ यांची उलट तपासणी झाली. सुनील कर्वे यांचे वकील देवदत्त सिंह यांनी पंकज भुजबळ यांची उलट तपासणी केली. दुपारच्या सत्रातही त्यांची चौकशी झाली. एमईटी हे ट्रस्ट आहे, ज्याच्या अंतर्गत मुंबईत मोठं एमईटी महाविद्यालय चालवलं जातं. भुजबळांच्या चौकशीदरम्यान अशाही बातम्या येत होत्या की काही आर्थिक गैरव्यवहार एमईटीच्या मार्गे केले गेले. याबाबतच धर्मादाय आयुक्तांनी पंकजना बोलावलं होतं. आता 28 मार्चला पुन्हा उलट तपासणी होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close