शिवजयंतीसाठी राज ठाकरेंनी केलं नव्या ध्वजाचं अनावरण

March 19, 2016 7:22 PM0 commentsViews:

shivjant_mns_flagठाणे – 19 मार्च : येणार्‍या शिवजयंतीसाठी मनसेनं जोरदार तयारी सुरू केलीये. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंतीसाठी नव्या ध्वजाचं अनावरण केलं. शिवजयंती जोरात साजरी करा अशी सुचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.

आज (शनिवारी) ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मनसेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यामेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी नवीन ध्वजाचे अनावरण केले. शिवजयंती निमित्त या ध्वजाचे अनावरण केल्याचे समजते. हा ध्वज लवकरच सर्व महाराष्ट्र भर वाटणार असून प्रत्येक कार्यकर्त्यांनी हा ध्वज घरी, शाखेत आणि गाडीवर लावून शिवजयंती जोरदार साजरी करा असे राज ठाकरे ह्यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close