पाकिस्तानला धूळ चारत, भारताचा ‘विराट’ विजय

March 19, 2016 11:51 PM0 commentsViews:

india_win43419 मार्च : भारताने विजयाची परंपरा कायम राखत पाकिस्तानला अखेर मौका दिलाच नाही. विराट कोहली आणि युवराज सिंगच्या तडाखेबाज बॅटिंगच्या बळावर भारताने पाकिस्तानला धूळ चारत 6 विकेटने शानदार विजय मिळवलाय. विराट कोहलीची तडाखेबाज 55 रन्सची अर्धशतकी खेळी करत भारताच्या शिरपेचात विजयाचा तुरा रोवलाय. भारताने टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानल पाचव्यांदा पराभूत केलंय. भारताने ईडन गार्डन्सवर होळीच्या आधीच विजयाच्या रंगाची उधळणं केलीये.

भारत पाकिस्तान सामना जणू दुसरेच युद्धच…पण, आजही भारताने पाकिस्तानला नेस्तेनाबूत करत ‘विराट’ विजय मिळवलाय. टी 20 वर्ल्डकपमध्ये अत्यंत चुरशीच्या अशा सामन्यात भारताने पाकिस्तानला 118 धावांत गुंडाळलंय. फिरकी बॉलरच्या मार्‍यापुढे पाकची टीम अडखळली पण धावाधाव सुरूच होती. 18 ओव्हर खेळत पाकिस्तानने 118 धावा पूर्ण केल्यात. पाकने भारताला 119 धावांचं आव्हान दिलंय.
119 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा आणि शिखर धवन झटपट आऊट झाले. रोहित शर्मा 10 रन्स, तर शिखर धवन 6 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर आलेल्या सुरेश रैना शुन्यावर आऊट झाला आणि भारतीय चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला. पण, युवराज सिंग आणि विराट कोहलीने टीम इंडियाची कमान सांभळली. पाकच्या बॉलर्सला संयमाने सामना करत चांगलीच धुलाई केली. युवराज सिंगने निर्णायक खेळी करत 24 रन्स करत विराटला चांगली साथ दिली. पण, वाहिब रियाजने त्याला 12 ओव्हरमध्ये आऊट केलं. युवराज आऊट झाल्यामुळे विराट आणि युवीची जोडी तोडण्यात पाक बॉलर्सला यश मिळाले. पण, विराटने याचा बदला घेत तडाखेबाज बॅटिंग करत अर्धशतक झळकावले. विराटने 37 बॉल्समध्ये 7 फोर आणि 1 सिक्स लगावत नाबाद 55 धावा केल्यात. तर कॅप्टन धोणीने नेहमी प्रमाणे विनिंग फिनिशिंग लाईन पूर्ण केली. भारताने 15.5 ओव्हरमध्ये 119 रन्स करत शानदार विजय मिळवला.

त्यापुर्वी पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-पाकिस्तान हायहोल्टेज मुकाबला तासाभराच्या उशिराने सुरू झाला. सकाळपासून कोलकात्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे भारत पाक सामन्यावर अनिश्चितीचे ढग जमा केले होते. पण, संध्याकाळी वरुणराजानी कृपा दाखवत वाट मोकळी करून दिली. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर तासाभराने महामुकाबला 18-18 ओव्हरने खेळवण्याचा निर्णय घेतला. भारताने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेत पाकिस्तानला बॅटिंगसाठी निमंत्रण दिलं. पाकने संयमाने सुरुवात करत सहाव्या ओव्हरमध्ये एकही विकेट जाऊ दिली नाही.

पण, आठव्या ओव्हरमध्ये सुरेश रैनाने पाक टीमला सुरुंग लावला. रैनाने शरजील खानला आऊट केलं. त्यानंतर 10 व्या ओव्हरमध्ये जसप्रीतने अहमद शहजादला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. टीमची कमान सांभळण्यासाठी आलेल्या कॅप्टन शाहिद आफ्रिदी काही कमाल दाखवू शकला नाही. हार्दिक पांड्याने 11 ओव्हरमध्ये 8 रन्सवर आफिद्रीला आऊट करून पाकला मोठा धक्का दिला. त्यानंतर 16 व्या ओव्हरमध्ये रविंद्र ज़डेजाने उमर अकमलला 22 रन्सवर आऊट केलं.

अखेरच्या चार ओव्हरमध्ये पाकिस्तानने टीम 44 रन्स कुटून धाव फलक उंचावला. निर्धारित 18 ओव्हरमध्ये पाकने 5 विकेटवर 118 धावा रचल्यात. भारताने 119 रन्स करत पाकिस्तानचा धुव्वा उडवलाय. टी वर्ल्डकपमध्ये भारताने पाकला पाचव्यांदा पराभूत केलं. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाचं कौतुक केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close