…म्हणून साक्षी धोनीच्या चाहत्यांवर वैतागली!

March 20, 2016 4:21 PM0 commentsViews:

Sakshi Twite

20 मार्च : टी-20 वर्ल्डकपमध्ये कोलकाच्या ईडन गार्डनवर पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष देशभरात साजरा करण्यात आला. कोलकातापासून दिल्लीपर्यंत देशाच्या कानाकोपर्‍यात विजय साजरा झाला. पण पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या आनंदोत्सवामुळे धोनीची पत्नी साक्षी चांगलीच वैतागली. कारण धोनीच्या चाहत्यांच्या जल्लोषामुळे धोनीच्या मुलीची झोप मोड होत होती.

टीम इंडियाचा विजयानंतर धोनीच्या घराबाहेरही क्रिकेट चाहत्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. मात्र यामुळे धोनीच्या लेकीची झोप मोड झाली. धोनीची पत्नी साक्षीने ट्विटरवरुन ही माहिती दिली.

माझ्या घराबाहेर गाडयांचे हॉर्न वाजवले जातायत, फटाके फोडले जातायत, घोषणा सुरू आहेत. तुम्ही सगळे मिळून माझ्या मुलीला झोपेतून उठवणार आहात असं वैतागून साक्षीने ट्विट केलं.

त्याआधी, साक्षीनेही टीम इंडियाला ट्विटरवरुन विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close