दबावात कसं खेळावं ते भारताकडून शिकावं- शाहीद आफ्रिदी

March 20, 2016 1:13 PM0 commentsViews:

Afridi

20 मार्च : महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दबाव कसा हाताळावा, याबाबत टीम इंडियाकडून शिकण्याची गरज असल्याचं पाकिस्तानचा कॅप्टन शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे.

ट्वेंटी-20 वर्ल्डकप स्पर्धेत काल (शनिवारी) भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या मॅच भारताने पाकिस्तानला 6 गडी राखून पराभूत केलं. या मॅचमध्ये विराट कोहलीने नाबाद 55 धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पाकिस्तानने दिलेल्या 119 धावांच्या आव्हानासमोर भारताची 3 बाद 23 अवस्था होऊनही भारताने सहज विजय मिळवला.

आफ्रिदी म्हणाला की, भारतीय खेळाडूंनी सरस कामगिरी केली. दबाव असूनही टीम इंडियाने चांगला खेळ केला आणि भारतीय फलंदाज परिपक्व झाले आहेत. आपल्यावर दबावात कसे खेळायचं हे भारताकडून शिकलं पाहिजे. कोहलीने अप्रतिम खेळी केली. आम्ही आणखी 25-30 धावा करण्याची गरज होती. विराटने आमच्याकडून सामना हिरावून घेतला. त्याने चांगली फलंदाजी केली, असे आफ्रीदी म्हणाला. यावेळी त्याने पिचबाबत तक्रारही व्यक्त केली. या प्रकारची पिच असेल अशी आशा नव्हती, असं ही तो म्हणाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close