‘चितळे उद्योगसमुहा’चे प्रमुख भाऊसाहेब चितळे यांचे निधन

March 20, 2016 2:46 PM0 commentsViews:

chitle231

पुणे – 20 मार्च : पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधू उद्योगसमूहाचे संस्थापक-प्रमुख रघुनाथराव ऊर्फ भाऊसाहेब चितळे यांचे आज रविवारी पुण्यात वुद्धापकाळनं निधन झालं.

भाऊसाहेब चितळे यांनी 1950 मध्ये चितळे बंधू मिठाईवाले या कंपनीची स्थापना केली. भाऊसाहेबांच्या वडिलांनी 1940 साली अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत डेअरी व्यवसाय सुरू केला. भिलवाडी आणि परिसरातील शेतकर्‍यांकडून दूध गोळा करून ते दूध आणि दुधाचे दर्जेदार पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवत होते. भाऊसाहेबांनी मात्र, वडिलांचा व्यवसाय फक्त डेअरीपुरता न ठेवता दूध, दही, लोणी, तूप श्रीखंडासोबतच लाडू, मोदक, करंज्या, बर्फी आदी पदार्थ बाजारात आणले. चितळ्यांची यांची खुसखुशीत खमंग बाकरवडी तर सातासमुद्रापार पोहोचली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close