अजित पवार मुख्यमंत्र्यांवर बरसले

March 17, 2010 1:08 PM0 commentsViews: 1

17 मार्चऊर्जामंत्री अजित पवार आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर बरसले. मंत्रीमंडळाच्या बैठकीतच अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जोरदार वाद झाला. राष्ट्रवादी काँग्रेसला निर्णयांमध्ये सहभागी न करून घेणे, राष्ट्रवादीला टार्गेट करणे, निधीवाटपाबाबत डावलणे या कारणांवरून हा वाद झाला. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानालाही अजित पवार हजर राहिले नाहीत. पण अजित पवार आणि आपल्याता असा कुठलाही वाद झाला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विरोधकांनी अगोदरच या चहापानावर बहिष्कार टाकला. तरीही सत्ताधार्‍यांनी सह्याद्री अतिथीगृहावर हा चहापानाचा कार्यक्रम आटोपला.मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर. आर. पाटील, पतंगराव कदम या ज्येष्ठ मंत्र्यांसह सत्ताधारी आघाडीच्या घटकपक्षांचे नेते चहापानाला उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित पवारांची गैरहजेरी विशेषपणे जाणवत होती.

close