व्हायोलिनचं वर्‍हाड लंडनला

March 20, 2016 8:35 PM0 commentsViews:

20 मार्च : पुण्यातील सुझुकी व्हायोलिन स्कुलच्या 15 विद्यार्थ्यांना लंडन इथल्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये वादनाची संधी मिळाली आहे. 27 मार्च इथं जगातील व्हायोलीन वादक कॉन्सर्टमध्ये वादन करणार आहे. आशियातून जपान आणि भारत या दोनच देशांना संधी मिळाली असल्याने ही सुवर्णसंधी असल्याची भावना स्कूलच्या डायरेक्टर रमा चोभे यांनी व्यक्त केलीय. पुण्यातील ही मुलं भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. वय वर्ष 6 ते 15 अश्या वयोगटातील ही मुले आहेत. या खास क्षणांचे साक्षीदार बनण्यासाठी पालकही कॉन्सर्टला जाणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close