वशिलेबाजी आरोपावरुन मुख्यमंत्र्यांची दिग्विजय सिंहांना नोटीस

March 21, 2016 8:48 AM1 commentViews:

cm_on_digi21 मार्च : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हणजेच एसआरएसाठी ऍक्सिस बँकेमध्ये पैसे जमा करण्याचा राज्य सरकारचा नियम आहे. त्यावर दिग्विजय सिंह यांनी 18 मार्चला ट्विट करून ही वशिलेबाजी असल्याची टीका केली होती.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या ऍक्सिस बँकेमध्ये व्हाइस प्रेसिडेंट पदावर काम करत आहेत. त्याकडे दिग्विजय सिंह यांचा रोख होता. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही नोटीस बजावली आहे. वास्तविक हा निर्णय 2012पासूनच अंमलात आहे. त्यामुळे दिग्विजय सिंह यांच्या आरोपामध्ये तथ्य नव्हतं.

दिग्विजय सिंह यांचं टि्वट

 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • नितीन निमकर

    नवविहित दिग्वीजय सिंगाचा हनिमुन संपला वाटत.मुख्यमंत्र्यांनी नोटीस तर दिली आहेच, पण याला कोर्टात खेचून सणसणीत नुकसानभरपाई भरायल लावूनच मुख्यमंत्र्यांनी सोडायला हवा. नाहीतर निर्लज्जासारखी माफी मागेल आणि नवीन आरोप करायला तयार राहील.

close