नुतनीकरणाच्या नावाखाली नगरसेवकाकडून पैशांचा चुराडा

March 21, 2016 9:00 AM0 commentsViews:

कल्याण – 21 मार्च : नगरसेवकांना मिळालेल्या निधीचा वापर करून नागरिकांसाठी आवश्यक सुविधा द्याव्यात अशी अपेक्षा असते. पण, अनेकदा या पैशांचा अपव्यय झाल्याचंच समोर येतं. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या घेला देवजी चौकात असा प्रकार आढळून आला. इथले नगरसेवक अरूण गीध यांनी गटारात गाळ असल्याचं दाखवून चांगल्या गटाराचा स्लॅब तोडून नुतनीकरण करायला सुरुवात केलीये. याबाबत महापौर आणि पालिका आयुक्त योग्य ती कारवाई करणार असल्याचं सांगण्यात येतंय.

kdmc3प्रत्येक नगरसेवकाला नगरसेवक निधीतून आपल्या विभागासाठी कमीत कमी 10 लाख रुपयांचा निधी मिळतो. परिसराचं नुतनीकरण, खराब रस्ते, गटार, बाग बगीचे, वृद्धांसाठी नाना नानी पार्क, वाचनालय, इतर अत्यावश्यक सेवा यांच्यासाठी हा निधी वापरावा अशी अपेक्षा असते. पण, अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. दर 5 वर्षांनी नगरसेवक बदलला की गटारे पायवाटा चांगल्या असल्या तरी त्या तोडून नवीन बनवल्या जातात असा अनुभव आहे.

त्यातच महापालिकेचा निधी संपवला जातो. आता महापौर याची पाहणी करण्याचे आदेश देणार आहेत. कल्याणातील सुज्ञ नागरिकांनी देखील ह्याबाबत खंत व्यक्त केली. कल्याण डोंबिवलीतील अनेक महत्वाचे प्रकल्प पैशांअभावी थांबले आहेत आणि नगरसेवक मात्र चिरीमिरीसाठी चांगली गटारे पायवाटा,पेवर बॉल्क गरज नसताना तोडून नवीन करीत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close