समीर भुजबळ यांची कोठडी आज संपणार, जामीन की पुन्हा कोठडी ?

March 21, 2016 9:27 AM0 commentsViews:

sameer_bhujbal3मुंबई – 21 मार्च : मनी लाँड्रिंग आणि महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी माजी खासदार समीर भुजबळ यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार आहे. त्यांना पुन्हा कोठडी मिळणार की जामीन मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी एक फेब्रुवारीला समीर भुजबळ यांना ईडीनं अटक केली होती. चौकशीमध्ये समाधानकारक उत्तरं न दिल्यानं समीर भुजबळांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 13 मार्चला माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली. समाधानकारक उत्तरं देत नसल्यानं छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची ईडीनं समोरासमोर बसवूनही चौकशी केली आहे. समीर भुजबळ यांच्या चौकशीतून 887 कोटींचा खुलासा अजून झालेला नाही. छगन भुजबळ सध्या 31 मार्चपर्यंत कोठडीत आहे त्यामुळे आज समीर भुजबळ यांना जामीन मिळतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close