देवनार डेपोची आग अजूनही धुमसतेय, परिसरात धुराचं साम्राज्य

March 21, 2016 11:19 AM0 commentsViews:

devnar_fireमुंबई – 21 मार्च : देवनार कचरा डेपोला रविवारी दुपारी दोनच्या सुमाराला पुन्हा आग लागली. ती आग अजूनही धुमसतेय. आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.

देवनार डेपोला पुन्हा एकदा आग लागलीये. या आगीमुळे धुराचे लोट या परिसरात पसरलेत. या आगीच्या धुरामुळे नागरिकांना धुराचा त्रास होतोय. त्यामुळे या परिसरात राहणार्‍या नागरिकांना श्वास घ्यायलाही त्रास होतोय. पैसे मिळवण्याच्या हेतूनंच इथले स्थानिक राजकारणी आणि माफिया यांनी हातमिळवणी केल्याचा आरोप इथले स्थानिक नागरिक करतायेत. पण त्यामुळे नागरिकांचं आरोग्य मात्र धोक्यात आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close