हिंगोलीत 5 मुलांचा नरबळी

March 17, 2010 1:35 PM0 commentsViews: 5

17 मार्च हिंगोली जिल्ह्यातील डिग्रसमध्ये 5 मुलांचा झालेला मृत्यू हा नरबळीचा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.डिग्रस या गावात गेल्या 3 महिन्यांपासून 5 मुलांचा संशयीत मृत्यू झाला होता. अनेक तपासण्या करुनही आरोग्य विभागाला या मृत्यूचे कारण शोधण्यात यश आले नाही. याप्रकरणी 8 मार्च रोजी कुरुंदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक क्राईम ब्रँचच्या तपासानंतर हा प्रकार नरबळीचा असल्याचा खळबळ जनक प्रकार उघडकीस आला.

close