हॅपी बर्थ डे, ट्विटर, ‘ट्विटिव’चे आज 10 वर्ष !

March 21, 2016 12:27 PM0 commentsViews:

twitter321 मार्च : सोशलमीडियामध्ये दादा असलेल्या ट्विटरचा आज दहावा वाढदिवस आहे. मायक्रोब्लॉगिंग प्रकारामुळे ट्विटर सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांच्या गळातलं ताईत बनलंय. आज अनेक सेलिब्रिटी, राजकारणी, मीडियाकर्मी, दिग्गज नेते ट्विटरवर आहे.

दहावर्षांपूर्वी 21 मार्च 2006 रोजी ट्विटरने आपली मुहूर्तमेढ रोवली होती. या दहा वर्षांच्या कालखंडात ट्विटरने कोटीच्या कोटी उड्डाण घेतलीये. दर दिवसाला कोट्यवधी ट्विट केले जाता आणि त्याच तुलनेत ट्विटरकरांची संख्याही वाढत आहे. 140 शब्दांच्या ट्विटपासून सुरू झालेला प्रवास आज मोक्याच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. आज ट्विटरवर व्हिडिओ, जिफ फाईल आणि सर्व्हे पोल घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिलीये. आज आम्ही जगभरात पोहचलो आहोत, अशा शब्दांत ट्विटरने ट्विटकरांचे आभार मानलेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close