लहान मुलांना विहिरीत सोडण्याची अजब प्रथा

March 17, 2010 1:44 PM0 commentsViews: 2

17 मार्च लहान मुलांना पाळण्यातून 50 फूट खोल विहिरीत सोडण्याचा अजब प्रकार सांगली जिल्ह्यातील भाटवडे गावात सुरू आहे. दरवर्षी गुढी पाडवा आणि दसर्‍याला ग्रामदैवत चिली देवीच्या मंदिराजवळ असणार्‍या विहिरीत हा प्रकार होतो. यामुळे बाळ रोगराई आणि संकटातून वाचते, अशी अंधश्रद्धा इथे आहे. वर्षानुवर्षे ही प्रथा सुरू आहे. गावामध्ये जन्माला येणारे अपत्य आणि बाहेर लग्न होऊन गेलेल्या मुली यांचे पहिले अपत्य या दिव्य प्रकाराला सामोरे जाते. या बाळांना वाजत गाजत विहिरीकडे आणले जाते. आणि त्याला पाळण्यातून विहिरीत सोडले जाते. या कार्यक्रमानंतर विहिरीजवळ पुरण पोळीचा स्वयंपाक केला जातो. आणि संपूर्ण गावात हा नैवैद्य वाटला जातो. सुदैवाने अजूनपर्यंत येथे कोणताही अपघात झालेला नाही. पण या प्रकारामुळे लहान मुले अत्यंत घाबरलेली असतात.

close