घोडबंदर हिट अँड रन्स प्रकरणी निमेश राणेला पुन्हा अटक करा, ठाणेकरांचा कँडल मार्च

March 21, 2016 2:28 PM0 commentsViews:

Thane hit-and-runठाणे – 21 मार्च : घोडबंदर रोडवर हिट अँड रन्स प्रकरणी आरोपी निमेश राणेला पुन्हा अटक करा या मागणीसाठी ठाणेकरांनी कँडल मार्च काढला. आरोपी निमेश राणेनं भरधाव गाडी चालवून दोन निष्पाप तरुणींचा जीव घेतल्याची घटना 6 मार्च रोजी घडली होती.

6 मार्च रोजी संध्याकाळी मृतक सुरभी गोरे आणि तिची मैत्रीण आकांक्षा कांबळे या घोडबंदर रोड येथे सिटी मॉलसमोर फुटपाथवर ज्यूस घेण्यासाठी थांबल्या होत्या. दरम्यान, भरधाव वॅग्नर कार या फुटपाथवर घुसली आणि या अपघातात नाहक या दोन तरुणीचा जीव गेला.

या घटनेचा निषेध आणि वाहतूक पोलिसांची कारवाईचा निषेध करण्यासाठी मृतक राहत असलेल्या श्रुती गर्दन सोसायटीचे रहिवाशी आणि दोघा तरुणीचे मित्र परिवार यांनी संयुक्तपणे सोसायटीपासून ते घटनास्थळापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. यात आमदार जितेंद्र आव्हाड आणि स्थानिक नगरसेवक संजय भोईर ही सामील झाले होते.

हातात मेणबत्त्या आणि डोळ्यातील अश्रूच्या वाहणार्‍या धारांनी सुरभी आणि आकांक्षा यांना अपघात झाला तेथे मेणबत्या लावून श्रद्धांजली वाहिली. पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा सूर नातेवाईक, मित्र परिवार आणि स्थानिक नागरिकांनी काढला. या प्रकरणाचा तपास हा कसून होणे गरजेचे असल्याची मागणी यावेळी नागरीकांमार्फत करण्यात आली. यावेळी या मार्चमध्ये उपस्थित आमदार आव्हाड आणि नगरसेवक भोइर यांनी ही या प्रकरणाची निपक्ष चौकशी आणि आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close