नोटांच्या हाराची पळवापळवी

March 17, 2010 2:14 PM0 commentsViews: 4

17 मार्च उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांचे 'नोटमाला' प्रकरण ताजे असतानाच पुन्हा तसाच प्रकार आज पाटणामध्ये घडला. राज्यसभेत गोंधळ घालणारे संयुक्त जनता दलाचे खासदार इजाज अली पटणा यांचे पाटणा विमानतळावर नोटांचा हार घालून स्वागत करण्यात आले. 1 लाख रुपयांच्या नोटांचा हार घालून इजाज अलींचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. पण काही वेळातच या नोटांच्या हारामधील नोटा हिसकावून घेण्याची चढाओढ कार्यकर्त्यांमध्ये लागली. आणि शेवटी हा हार कार्यकर्त्यांनी लांबवलाच.

close