28 मार्चपर्यंत परवाने न दिल्यास पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊ, डान्स बार असोसिएशनचा इशारा

March 21, 2016 5:06 PM0 commentsViews:

dance-bar-bar-girls_bdbdbae0-e058-11e5-9948-13623a58218c

मुंबई – 21 मार्च : राज्य सरकारनं 28 मार्चपर्यंत डान्स बारचे परवाने न दिल्यास दाद मागण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा डान्स बार असोसिएशननं दिला आहे. डान्स बार सुरु करण्यासाठी ज्या अटी घालून दिल्या आहेत त्याची आम्ही पूर्तता केली असूनही सरकार इतर अटी टाकून परवाने देण्याची प्रक्रीया किचकट करत असल्याचा आरोप असोसिएशननं केला आहे.

डान्स बारसाठी ज्या 26 अटी आहेत त्यात रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवणं ही एक अट आहे. त्यासाठी 18 मार्चला बैठक होणं अपेक्षित होतं, मात्र ही बैठक आता 26 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. डान्स बारच्या प्रवेशद्वारासोबतच बारच्या स्वयंपाकघराचं दार, मागचं दार इथंदेखील सीसीटीव्ही हवेत असं सरकारी अधिकारी सांगत असल्याची तक्रार देखील बार मालक करत आहेत. अग्नीरोधक यंत्रणा सक्षम असल्याचं प्रमाणपत्रासाठी देखील डान्स बारचा परवाने रोखले जातायंत आणि ही सगळी प्रक्रीया वेळखाऊ आहे, अशीही तक्रार असोसिएशनने केली आहे. या सगळ्या प्रकारांमुळे जर 28 मार्चपर्यंत आम्हाला परवाने नाही मिळाले आम्हाला सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही असही या असोसिएशननं स्पष्ट केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close