औरंगाबादमध्ये सावकाराची मुजोरी, शेतकर्‍याच्या कुटुंबाला काढलं घराबाहेर

March 21, 2016 8:33 PM0 commentsViews:

Auranfabada

मुंबई – 21 मार्च : औरंगाबादेत सावकारानं शेतकर्‍याला घराबाहेर काढल्याची संतापजनक घटना घडली आहे. संजय राठोड नावाच्या सावकारानं या पीडित कुटूंबाला सामानासकट घराच्या बाहेर काढलं आहे. कालपासून हे कुटूंब चिकलठाणा पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेलं आहे.

बाबासाहेब सावंत आणि त्यांची पत्नी वैशाली हिच्यावर सावकरानं हल्ला करून मुलाबाळांसोबत त्यांना घराच्या बाहेर काढून दिले. सावकार संजय राठोड यांनी शेतकर्‍याच्या पत्नीच्या अंगावरील कपडे फाडून तीला नग्न करण्याचा प्रयत्नही केल्याचा आरोप शेतकर्‍याच्या पत्नीनं केला आहे. बाबासाहेब यांनी सावकाराकडून 1 लाख 30 हजार कर्ज घेवून त्यांचे प्लॉट गहाण ठेवले होते. नंतर बाबासाहेब यांनी काही पैसे सावकाराला देवून घर बांधले. सावकार असलेल्या संजय राठोड यांनी आता ती जागा घरासहित आपल्या नावावर केल्याचा आरोप शेतकर्‍यानं केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close