समीर भुजबळ यांच्या मागणीचा विचार होणार

March 17, 2010 3:21 PM0 commentsViews: 1

15 मार्चमहिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल संशयाचे वातावरण तयार होत आहे. महिला आरक्षणात ओबीसींसाठी कोटा द्या, या समीर भुजबळांच्या मागणीचा विचार करण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखवली आहे. अशी मागणी पक्षाविरोधात म्हणता येणार नाही, असे पक्षाचे नेते तारीक अन्वर यांनी म्हटले आहे. समीर भुजबळांनी पंतप्रधानांना पत्र लिहून ओबीसी कोट्याची मागणी केली होती. छगन भुजबळ यांनीही नुकतीच ओबीसी आरक्षणाची मागणी केली होती. त्यावेळी आस्ते कदम जाण्याचा सल्ला खुद्द शरद पवारांनीच भुजबळांना दिला होता.

close