खराब रस्ते बनवणार्‍या कंत्राटदारांवर कारवाई झालीच पाहिजे -आदित्य ठाकरे

March 22, 2016 9:03 AM0 commentsViews:

aditya-thackeray_650x400_81444288671मुंबई – 22 मार्च : शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सोमवारी रात्री मुंबईतल्या रस्त्यांची पाहणी केली. मुंबईत खराब रस्ते बनवणार्‍या कंत्राटदारांवर कारवाई केलीच पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

आदित्य ठाकरे यांनी गिरगाव, चेंबूर आणि किंग सर्कल इथल्या रस्त्यांची पाहणी त्यांनी केली. आपण या कामाबद्दल समाधानी आहोत असं त्यांनी सांगितलं. तसंच देवनार डंपिंग ग्राऊंड आग प्रश्नी आयुक्तांशी बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गिरगाव, चेंबूर आणि किंग सर्कल इथल्या रस्त्यांची पाहणी त्यांनी केली. विशेष म्हणजे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आता कंत्राटदारांवर बोट ठेवल्यामुळे कंत्राटदारांवर कारवाई होते का हे पाहावं लागेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close