भुजबळांना दणका, 55 कोटींची मालमत्ता जप्त

March 22, 2016 9:34 AM0 commentsViews:

bhujbal_arrestमालेगाव – 22 मार्च : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ सध्या कोठडीत आहे. आता भुजबळ कुटुंबीयांना ईडीनं आणखी एक दणका दिलाय. भुजबळ कुटुंबीयांच्या आर्मस्ट्राँग या कंपनीच्या मालकीचा असलेला गिरणा साखर कारखाना आणि 290 एकर जागा अशी एकूण 55 कोटींची मालमत्ता ईडीनं काल जप्त केली.

मालेगावमधल्या कसमादे पट्‌ट्यातल्या दाभाडी शिवारात हा कारखाना आहे. अवसायानात गेलेला हा कारखाना 1997 मध्ये भुजबळ कुंटुंबाच्या मालकीची असलेल्या आर्मस्ट्राँग कंपनीनं अवघ्या 28.5 कोटींत घेतला होता. पण, कारखाना खरेदीसाठी पैशांचा स्रोत भुजबळांनी सांगितला नाहीये. बाजारभावाप्रमाणे 150 कोटी रुपये किंमत असलेला कारखाना फक्त 28.5 कोटींमध्ये कसा घेतला गेला याची चर्चा खरेदीपासूनच सुरू होती. तर समीर भुजबळ यांच्या ईडी कोठडीत 31 मार्चपर्यंत वाढ करण्यात आलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close