वक्तव्य भोवलं, अखेर श्रीहरी अणेंचा राजीनामा

March 22, 2016 10:53 AM1 commentViews:

aney bannerमुंबई – 22 मार्च : वेगळ्या विदर्भानंतर वेगळ्या मराठवाड्याची भूमिका मांडणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. आज मंगळवारी सकाळी अणेंनी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. याबाबतची औपचारिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी वेगळा विदर्भाची भूमिका मांडून एकच खळबळ उडवून दिली होती. नागपूरच्या अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटले. पण, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अणेंना पहिली चूक माफ केली. पण, त्यानंतर पुन्हा एकदा श्रीहरी अणे यांनी मराठवाड्यावर खूप अन्याय झालाय त्यामुळे वेगळ्या मराठवाड्याची मागणी रास्त आहे असं वक्तव्य करून आणखी एक ‘बॉम्ब’ फोडला. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने श्रीहरी अणे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत विधानसभा दणाणून सोडली होती. काल मंगळवारी विधानसभेच्या सभागृहाचं कामकाज तब्बल पाचवेळा तहकूब करावं लागलं.

श्रीहरी अणेंचा राजीनामा सरकारनं घ्यावा किंवा त्यांना बडतर्फ करावं अशी मागणी विरोधी पक्षेनेते राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना नेते प्रताप सरनाईक, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केली. विधानपरिषदेतही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ही मागणी लावून धरली. अखेर यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन देणार असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं.

श्रीहरी अणे यांची एकतर हकालपट्टी होईल किंवा ते स्वत:हून राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली गेली. मुख्यमंत्र्यांनीही अणेंना तशी सुचनाच दिली होती. अखेर मंगळवारी सकाळी 10 वाजता अणे यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे अणेंनी राजीनामा दिला असला तरी शिवसेनेनं अणे यांची राज्याची जाहीर माफी मागावी अशी ठाम भूमिका मांडलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


 • ANiket

  I am from Nagpur (2nd Capital of “Maharashtra”)

  The ground reality on this issue is, that no common man from Vidarbha region wants a separate state.

  It’s just a handful non marathi business class & some failed local politicians who wants it for their own interest.

  This has been proved several times by the failure of leaders in polls who contested the election only on the seperate state agenda.

  No one cares of these separatist leaders any more.

  Who are these people demanding the seperate state?

  What credibility do they have?

  Most of them have been switching parties for personal interests, do they really care about well being of Vidarbha?

  There is no public demand for this, we want the state to be united.

  We will fight for our backlog but never ever seperate from our Identity.

  Jai Maharashtra !

close