‘देवनार’च्या आगीची केंद्राकडून दखल, केंद्राचं पथक करणार आज पाहणी

March 22, 2016 12:03 PM0 commentsViews:

devnar33मुंबई -22 मार्च : देवनार डंपिंग ग्राऊंडची आग 40 तासांनतरही धुमसतेच आहे. या आगीच्या चौकशीची पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गंभीर दखल घेतली. केंद्रीय पथक आज या ठिकाणाची पाहणी करणार आहे. याप्रकरणी जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करू असा इशारा जावडेकर यांनी दिलाय.

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर दोन दिवसांपूर्वी पुन्हा आग लागली. 40 तासांनंतरही देवनार डम्पिंग धुमसतंय. आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून सुरूच आहे. जवळपास 20 गाड्या घटनास्थळी दाखल आहे. आगीमुळे डम्पिंग ग्राऊंड परिसरात धुराचे लोट पसरले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी श्वसनाचा त्रास होतोय.

मुंबईतल्या देवनार कचरा डेपोच्या आगीच्या चौकशीची पर्यावरममंत्री प्रकाश जावडेकर यांनी गंभीर दखल घेतली. केंद्रीय पथक आज या ठिकाणाची पाहणी करणार आहे. याप्रकरणी जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करू असा इशारा जावडेकर यांनी दिलाय. काही दिवसांपूर्वी डेपोला लागलेल्या आगीबाबात मुख्यमंत्र्यांनी विशेष चौकशी समिती नेमूनही काहीच उपाययोजना का झाल्या नाहीत. यामागे बिल्डर लॉबी किंवा समाजकंटक तर नाहीत ना, असा सवाल इथले रहिवासी विचारत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close