माथेफिरूच्या गोळीबारात मुंबईत मुलीचा मृत्यू

March 18, 2010 9:02 AM0 commentsViews: 1

18 मार्चमाथेफिरूने केलेल्या गोळीबारात एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना आज मुंबईतील अंधेरीत घडली. अंधेरीतील सौजन्या सोसायटीत हरिष मरोलिया याने भर दिवसा हा गोळीबार केला. या गोळीबारात हिमानी मेहता या 16 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. हरिषच्या गोळीबाराला उत्तर म्हणून पोलिसांनी गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या गोळीबारात पीएसआय वैभव पाटील आणि कॉन्स्टेबल फोकले जखमी झाले. हरिष मलोरिया हा रिटार्यड कस्टम ऑफिसर होता.

close