अॅपलचा स्वस्त ‘आयफोन एसई’ फक्त 39 हजारांना !

March 22, 2016 12:54 PM0 commentsViews:

22 मार्च : मोबाईल क्षेत्रातली दादा कंपनी ऍपलने आपला स्वस्त आणि मस्त असा बजेट फोन सादर केला खरा पण, स्वस्त फोनचा दावा करणार्‍या अॅपलचा फुगा फुटलाय. कारण, अॅपलचा आयफोन एसई हा 30 हजारांचा नसून 39 हजारांचा आहे असं अॅपलने जाहीर केलंय. त्यामुळे हा खरंच बजेट फोन आहे का असा प्रश्न आता उपस्थिती झालाय.iphonese

एकीकडे अँड्राईड फोनने मार्केट व्यापून गेलंय. त्यातही स्वस्त आणि बजेट फोनचा बोलाबाला आहे. भारताची लोकसंख्या पाहता सर्वात मोठ्या या बाजारपेठेत मात्र अॅपलला अजूनही हवं तसं यश मिळालं नाही. भारतातच नाहीतर जगभरात ऍपलच्या विक्रीत 1 टक्क्याने घट झालीये. त्यामुळे अॅपलने स्वस्त फोन आणणार अशी वर्षभरापूर्वी घोषणा केली. वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर सोमवारी ऍपलने आयफोन एसई लाँच केलाय. 4 इंच स्क्रीनचा हा आयफोन एसई आयफोन 5 सीचं पुढंचं व्हर्जन आहे.

आयफोन एसईची किंमत 30 हजार असल्याची घोषणा झाली होती. पण, सहा तासांत ऍपलने पत्रक प्रसिद्ध करून आयफोन एसईची किंमत 39 हजार असल्याचं स्पष्ट केलं. 16 जीबीचा हा आयफोन भारतात 39 हजारांत उपलब्ध होणार आहे. 64 जीबीमध्येही हा फोन उपलब्ध होणार आहे. पुढील महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये हा फोन भारतात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

iphonese_34ज्या लोकांना मोठ्या स्क्रीनचा फोन नकोय अशा ग्राहकांची पसंती लक्षात घेत अॅपलने 4 इंच स्क्रीनचा हा फोन लाँच केलाय. आयफोन एसई हा स्पेशल एडिशन फोन आहे. त्यामुळे त्याला एसई असं नाव दिलंय. भारतीय मोबाईल बाजारपेठेचा विचार केला तर सर्वात स्वस्त आणि चांगल्या फिचर्सच्या फोनला सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे अॅपलने आपल्या आयफोनच्या किंमतीत मोठी कपात केली होती. आयफोन 5 सीची किंमत आज 18 ते 22 हजारांमध्ये  विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे आयफोन एसईला भारतीय ग्राहक किती पसंती देता हे पाहण्याचं ठरेल. भारताबाहेर मात्र, अॅपलाचा हा सर्वात स्वस्त फोन आहे.

कसा आहे आयफोन एसई ?

स्क्रीन – 4 इंच
टच आयडी
A9 प्रोसेसर
M9 मोशन प्रोसेसर
12 मेगापिक्सेल कॅमेरा
64 बिट ए 9 चीप
4k व्हिडिओ क्षमता
वाय – फाय कॉलिंग
फास्टर एलटीई
व्हॉईस ओव्हर एलटीई
आयओएस 9.3
1080p आणि 60 fps व्हिडिओ क्षमता
टच आयडी फिंगरप्रिंट सेन्सर
नवे मायक्रोफोन्स


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close