श्रीहरी अणेंनी जाहीर माफी मागावी, सेनेची मागणी

March 22, 2016 1:33 PM0 commentsViews:

sena_on_anne322 मार्च : विदर्भासह मराठवाडा वेगळा करण्याची मागणी करून वाद ओढवून घेणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. पण, अणेंनी राज्याची माफी मागावी आणि त्यांच्या राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेनं केलीये.

श्रीहरी अणे यांनी आज सकाळी 10.30 वाजता राजभवनावर राज्यपाल सी विद्यासागर राव यांना भेटून आपला राजीनामा त्यांनी सोपावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिली आणि विरोधकांनी एकच गदारोळ केला. अणेंनी सभागृहात माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. तर विरोधकांनी अणेंच्या वक्तव्याचं राजकारण करु नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आणि राज्यपालांना अणेंचा राजीनामा स्विकार करा, अशी शिफारस करणार असल्याचं निवदेन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलंय.परंतु, दुसरीकडे शिवसेनेनं अणे यांनी माफी मागावी अशी ठाम भूमिका मांडलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close