आदिवासी होस्टेलमधील मुलींची प्रेग्नन्सी टेस्ट

March 18, 2010 9:12 AM0 commentsViews: 36

18 मार्चजळगावातील चोपडा शहरात आदिवासी होस्टेलमधील मुलींची प्रेग्नन्सी टेस्ट करण्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. रुटीन चेकअपच्या नावाखाली रेक्टर संगीता सूर्यवंशी यांनी कोणतीही परवानगी नसताना या तपासण्या करून घेतल्या. 8 वी ते 12 वीच्या 45 विद्यार्थिनींची प्रेगनन्सी टेस्ट करण्यात आली. तर 15 मुलींची सोनोग्राफीही करण्यात आली. तणावात असलेल्या या मुलींकडून ही माहिती समजल्यावर पालकांनी या रेक्टर संगीता सूर्यवंशींना रंगेहाथ पकडले. रेक्टर सूर्यवंशींना अखेर या दवाखान्यातून अखेर पळ काढावा लागला. 'आयबीएन-लोकमत'वर ही बातमी दाखवल्यानंतर संगीता सूर्यवंशी यांच्यावर त्वरीत निलंबनाची कारवाई करण्यात आली.

close