अणेंचा बोलविता धनी संघ आणि भाजप -राज ठाकरे

March 22, 2016 4:07 PM0 commentsViews:

 raj thackaey pc22 मार्च : श्रीहरी अणेंचा बोलविता धनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच आहे असा घणाघाती आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. राज्य तोडण्याचं काम अणे यांच्यापेक्षा संघ आणि भाजप करतंय असा गंभीर आरोपही राज यांनी केला.

वेगळ्या मराठवाड्याच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यामुळे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांना आज आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. विरोधकांच्या रेट्यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीहरी अणे यांना राजीनामा देण्याची सुचना केली अशी माहिती आता समोर येत आहे. या सगळ्या गोंधळावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अणे आणि भाजपचा खरपूस समाचार घेतलाय. श्रीहरी अणे यांचा बोलविता धनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप आहे. कारण, छोट्या राज्यांची भूमिका संघाची आहे. भाजप तीच भूमिका पुढे नेतंय. त्यामुळे राज्य तोडण्याचं काम अणे यांच्यापेक्षा संघ आणि भाजप करतंय असा आरोप राज यांनी केला. तसंच अणे नेमके अधिवेशन काळातच कसं काय बोलतात? हा योगायोग कसा मानावा?, विदर्भाच्या मुद्द्यावर ते नागपूर अधिवेशनात बोलले होते. आणि आज या अधिवेशनात बोलले. मुळात अणे यांच्या मनात नसताना त्यांना या पदावर आणून बसवलं होतं असा टोलाही राज यांनी लगावला. भाजपकडून आपलं अपयश झाकण्यासाठी विभाजनाच्या गोष्टी केल्या जात आहेत अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close