संशयीत अतिरेक्यांना कोठडी

March 18, 2010 9:21 AM0 commentsViews:

18 मार्चओनजीसी उडवण्याप्रकरणी मुंबईत अटक करण्यात आलेल्या संशयीत दहशतवाद्यांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अब्दुल लतिफ उर्फ गुड्डू आणि रेहान अली उर्फ सलीम अशी दोन संशयित अतिरेक्यांची नावे आहेत. कांदीवली भागात राहणार्‍या अब्दुल लतिफच्या नातेवाईकांनी मात्र या सर्व गोष्टी फेटाळून लावल्या आहेत. अब्दुलला पोलिसांनी संशयीत अतिरेकी म्हणून अटक केल्याने त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. अब्दुल लतिफ फ्रीज टीव्हीचे कव्हर बनवण्याचे काम करत होता. त्याचे कोणत्याही अतिरेकी संघटनाशी संबध नसल्याचा दावा त्याच्या पत्नीने केला आहे.

close