राज्याचं चार भागांत विभाजन झालं पाहिजे – मा. गो. वैद्य

March 22, 2016 8:43 PM0 commentsViews:

rss_647_110815065146

22 मार्च : महाराष्ट्राचं चार भागांत विभाजन झालं पाहिजे असं मत व्यक्त करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो वैद्य यांनी श्रीहरी अणे यांच्या राजीनाम्याचे मात्र समर्थन केले आहे. ते आज नागपूरमध्ये बोलत होते.

आंदोलन करुन राज्य वेगळे न करता, छोट्या राज्यांच्या स्थापनेसाठी राज्य पुनर्गठन आयोगाची स्थापना केली पाहिजे अशी मागणीही वैद्य यांनी केली आहे. नव्या पुनर्रचनेत 3 कोटींपेक्षा जास्त आणि 50 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येचं राज्य नसावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. आणि असं झालं तर महाराष्ट्राचे चार विभाजन होऊ शकतात.

यावेळी बोलताना त्यांनी श्रीहरी अणेंच्या राजीनाम्याचे समर्थन करतानाच महाराष्ट्राचे दोन नाही तर चार राज्य व्हावीत. नवीन राज्य पूनर्रचना आयोग नेमावा आणि त्या आयोगाने तीन कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले राज्य वेगळे करावे, अशी भुमिकाही त्यांनी मांडली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close