कांद्याच्या भावात घट

March 18, 2010 9:29 AM0 commentsViews: 1

18 मार्चनाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. कांद्याचा भाव 4 रुपये प्रति किलो झाला आहे. मार्केटमध्ये कांद्याची मोठी आवक झाल्याने हे भाव कोसळले आहेत. त्याचा संबंध कांद्याच्या निर्यात भावांशी आहे. नोव्हेंबरपासून कमी केलेले निर्यात दर सरकारने राजकीय दबावामुळे वाढवले नसल्याने शेतकर्‍यांचे हे नुकसान होत आहे. दिल्लीतील ग्राहकांना कमी किंमतीत कांदा मिळावा असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. म्हणून कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करून केंद्र सरकार अप्रत्यक्षपणे कांद्याचे मार्केट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. मात्र कांद्याच्या कोसळलेल्या दरामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे.

close