परीक्षेचा बोजा होणार कमी

March 18, 2010 9:36 AM0 commentsViews: 6

18 मार्चदर दोन महिन्यांतून होणार्‍या लेखी घटक चाचण्यांना आता राज्यसरकारने नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे. हा पर्याय असेल प्रात्यक्षिके, प्रकल्प कार्य, वर्गपाठ, निबंध अशा नवीन कल्पनांचा. घटक चाटण्याचे हे बदललेले स्वरूप येत्या शैक्षणिक वर्षांपासून शाळांमध्ये दिसायला लागेल. मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाखाली संबंधित विषयाचे शिक्षक, घटक चाचणीचे स्वरूप नेमके काय असेल याचा निर्णय घेऊ शकतील. आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारती संघटनेने घटक चाचण्याचे स्वरूप बदलावे या मागणीसाठी शिक्षक विभागाकडे पाठपुरावा केला होता. या घटक चाचण्यांमध्ये आता समावेश करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने घेतला आहे. सरकारच्या निर्णयानुसार वर्षातून 4 घटक चाचण्या घेण्याचा जीआर आहे. पण शाळांनी याचा चुकीचा अर्थ लावत विद्यार्थ्यांवर केवळ लेखी परिक्षेचा भार टाकल्याचे दिसून आले आहे. आणि म्हणूनचे एससीईआरटीने घटक चाचण्यांचे स्वरूप बदलण्याचे आदेश दिले आहेत. घटक चाचणीचा शासन निर्णय असे सांगतो…* विद्यार्थ्याला विषय पूर्ण समजला पाहिजे * घटक चाचणीतील मूल्य, कौशल्य विद्यार्थीला कळतात की नाही हे पहाणे*फक्त विद्यार्थ्यांचे मूल्यमापन नाही तर शिक्षकांच्या शिकवण्याचेही मूल्यमापन करावे*काही विद्यार्थ्यांना विषय समजला नसल्यास त्याबद्दल उपाय योजना आणि नियोजन करणे*एक घटक चाचणी 20 मार्कांची असेल आणि मूल्यांकनात फरक होणार नाही*शिक्षकांनी प्रत्येक घटक चाचणीचे स्वरूप (लेखी तोंडी आणि प्रात्यक्षिक) हे अभ्यासक्रमावरून निश्चित करावे*विद्यार्थ्यांवर ताण येऊ नये म्हणून शिक्षकांनी मोकळ्या आणि ताणरहीत वातावरणात घटक चाचण्या घ्याव्यात*घटक चाचणी आयोजनाऐवजी इतर कोणतेही मूल्यमापनाचे साधन, उदाहरणार्थ- मासिक क्षमता चाचणी मैदानिक कसोटी किंवा उपक्रम व प्रकल्प या स्वरूपात घटक चाचणी घेता येईल.

close