शिवसेना श्रीहरी अणेंच्याविरोधात पुन्हा दाखल करणार हक्कभंग

March 23, 2016 9:14 AM0 commentsViews:

Sena on ANey2322मुंबई – 23 मार्च : स्वतंत्र विदर्भ आणि स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणारे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यावर आज (बुधवारी) शिवसेना पुन्हा हक्कभंग आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधिमंडळात माझ्या मुद्यावरून ठरवून गोंधळ घातला जातोय,असा आरोप अणे यांनी शिवसेनेवर केला होता.

अणे यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या विधानांचे संदर्भ देत शिवसेनेनेच आपली माफी मागावी, असं म्हटलं होतं. अणेंच्या या विधानानंतर आक्रमक झालेल्या शिवसेना नेत्यांनी अणे यांच्यावर विधानसभेत हककभंग आणण्याची तयारी केली आहे. शिवसेनेतल्या उच्चपदस्थ सूत्रांनी आयबीएन लोकमतला ही माहिती दिलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close