बँकेचे व्यवहार आजच उरकून घ्या !, 4 दिवस असणार बँका बंद

March 23, 2016 8:32 AM0 commentsViews:

bank_band323 मार्च : बँकेतले व्यवहार जर तुम्हाला करायचे असतील तर आजच करून घ्या…! कारण, उद्यापासून सलग चार दिवस बँकांना सुट्टी आहे. गुरुवारी होळी आहे, शुक्रवारी गुड फ्रायडे आणि त्यानंतर महिन्यातील चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी आहे. तर रविवारी साप्ताहिक सुट्टी आहे. त्यामुळे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहे.

या चार दिवसांत ग्राहकांची मदारही एटीएम असणार आहे. त्यामुळे लोकांना अडचण येऊ नये म्हणून बँका एटीएममध्ये पुरेशी रक्कम ठेवणार असल्याचंही कळतंय. त्यामुळे बँकेचे व्यवहार आजच उरकून घ्या, जर तुम्हाला शिल्लक रक्कम हवी असले तर आजच बँकेतून काढून घेतलेले बरे अन्यथा पैशांच्या टंचाई भासू शकतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close