‘गुटख्याचा साठा जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना नाही !’

March 23, 2016 9:49 AM0 commentsViews:

guthaka_raidऔरंगाबाद – 23 मार्च : राज्यात गुटख्याच्या साठ्यावर महाराष्ट्र पोलिसांना धाड टाकून जप्त करता येणार नाही. तो अधिकार फक्त अन्न आणि औषधी विभागालाच असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलाय.

पोलीस गुटख्याच्या साठा जप्तीबद्दल व्यापार्‍यांना त्रास देतात अशी याचिका औरंगाबाद हायकोर्टात दाखल केली होती. त्यावरून कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. गुटखा किंवा विषारी रसायनयुक्त तंबाखूमुळं एखाद्याचा मृत्यू झाला तरच गुन्हा आयपीसीच्या कलमानूसार दाखल होवू शकतो असंही कोर्टाने नमूद केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close