ठाण्यात पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

March 23, 2016 1:31 PM0 commentsViews:

crime sceneठाणे -23 मार्च : वर्तकनगरमध्ये कौटुंबीक कलहातून सीताराम पेडणेकर याने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. पत्नीच्या हत्येनंतर त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय.

ठाण्याच्या वर्तकनगरमध्ये इमारत क्रमांक 27 मध्ये राहणारे पेडणेकर कुटुंबातील मुलगा प्रथमेश आणि वडील सीताराम पेडणेकर रक्तांच्या थारोळ्यात आढळले. तर पत्नी विद्या पेडणेकर यांचा मृत्यू झाला होता. पती सीताराम पेडणेकर आणि मुलगा प्रथमेश पेडणेकर याची प्रकृती गंभीर आहे. तिघांच्या हाताच्या नसा कापल्या आहेत. दोघांनाही तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पहिल्यांदा या कुटुंबावर कुणी बाहेरच्या व्यक्तीने हल्ला केला का असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांच्या चौकशीतून सीताराम पेडणेकर यानेच हत्या केल्याचं समोर आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close