मराठवाड्याला वेगळं करणार्‍यांचं थोबाड फोडीन -चंद्रकांत खैरे

March 23, 2016 1:54 PM0 commentsViews:

chandrakant_khaire3औरंगाबाद – 23 मार्च : माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे आणि शिवसेनेचा ‘सामना’ सुरूच आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा तर या प्रकरणी तोल सुटला. मराठवाड्याला महाराष्ट्रातून वेगळ करणार्‍यांचं यापुढे थोबाड फोडीन अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी अणेंचं नाव न घेता सज्जड दम भरलाय. एवढंच नाहीतर श्रीहरी अणे यांना औरंगाबादेतील शहीद स्तंभासमोर नाक घासण्यास भाग पाडीन अशी गर्जनाही त्यांनी केली.

‘कुणीही उठतं मराठवाड्याबद्दल बोलतंय. त्या अण्याला काय गरज आहे असं बोलायची…उपटसुंब्या कुठला…विदर्भ विदर्भ करतोय..ते करं आम्हाला काही नाही त्याचं…मराठवाड्याबद्दल काही बोलायचं नाही” अशा शिवराळ भाषेत सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपला संताप व्यक्त केलाय.

अणेंचा ऐकरी उल्लेख करत औरंगाबादमध्ये आल्यावर दाखवतोच अशी धमकीच खैरेंनी दिली. खैरे एवढ्यावरच थांबले नाही. अणेंनी शिवसेनेनं विदर्भाची माफी मागावी अशी मागणी केली असा सवाल विचारला असता. खैरे चांगलेच संतापले. त्या अणेला औरंगाबादमध्ये आणून क्रांतीचौकात शिवरायांच्या पुतळ्यासमोर नाक घासायला लावू, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे. वेगळ्या मराठवाड्याबद्दल खपवून घेणार नाही असंही खैरे यांनी ठणकावून सांगितलं. विशेष म्हणजे, चंद्रकांत खैरे हे पहिल्यांदाच असं बोलले असं नाही. याआधीही त्यांनी तहसिलदार रमेश मुनलोड यांना शिवीगाळ केली होती. आता तर खैरेंनी थेट मारामारीची भाषा केलीये. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबद्दल काही भूमिका घेता का हे पाहण्याचं ठरेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close